स्मार्ट स्कूल इंटरॅक्टीव पॅनल वॉरंटी नियम व अटी
1. सदर पॅनल बसवल्यावर पुढील 3 वर्षे यासाठीची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी लागू असेल.
2. सदर पॅनल यामध्ये कोणताही मॅन्युफॅक्चरिंग डीफेक्ट असल्यास त्याची संपूर्ण
दुरुस्ती किंवा आवश्यक असल्यास संपूर्ण पॅनल बदलून देण्याची जबाबदारी *(नियम व अटी लागू) मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी यामध्ये समाविष्ट आहे. सदर पॅनल हा अँन्ड्रॉईड मोबाइल
असल्यागत आहे. त्याच पद्धतीने याची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी लागू असेल.
3. पॅनल बसवून घेतल्यानंतर त्याची योग्य ती काळजी आणि देखभाल घेण्याची जबाबदारी
संबंधित शाळा / संस्था यांची असेल. स्वच्छ व धूळ विरहित खोली ठेवणे, इतर तोडफोड
यापासून संरक्षण करणे आणि योग्य पद्धतीने प्रमाणित विद्युतपुरवठा सुरळीत ठेवणे
यासह यासाठीची इंटरनेट जोडणी आणि इतर सर्व घटक यांची जबाबदारी संबंधित शाळा /
संस्था यांची असेल.
4. व्हॉल्टेज फ्लक्च्युएशन होऊन पॅनलमधील वायरिंग जळणार नाही यासाठी स्टेबीलायझर
किंवा युपीएस यांचा वापर केल्यास सदर पॅनल जास्त वर्षे चालू शकेल. त्यासाठीची
काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित शाळा / संस्था यांची असेल.
5. आकडा टाकून लाइट वापरणे किंवा हाय व्हॉल्टेज विद्युत पुरवठा यांचा वापर करू
नये. तसेच लो व्हॉल्टेज विद्युत पुरवठा असल्यास पॅनल चालवू नये.
6. पॅनल जोडणी केलेल्या ठिकाणी योग्य पद्धतीने प्रमाणित विद्युतपुरवठा आणि
इलेक्ट्रिक फिटिंग यामध्ये योग्य पद्धतीने अर्थनिंग जोडणी केलेली असावी. असे
नसल्यास पॅनलद्वारे कोणालाही विजेचा धक्का बसून दुर्घटना घडू शकते. हे टाळण्यासाठी
योग्य पद्धतीने अर्थनिंग जोडणी करून घेण्याची व त्याची काळजी घेण्याची जबाबदारी
संबंधित शाळा / संस्था यांची असेल.
7. पॅनल बसवून दिल्यावर यासाठीची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी लागू होते. मात्र, सदर
वॉरंटी लागू राहण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग डीफेक्ट वगळता फक्त सॉफ्टवेअर आणि इंटर्नल
तांत्रिक बिघाड यासाठी यासाठीची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी लागू असेल.
8. जाणीवपूर्वक किंवा अपघाताने सदर पॅनल यामध्ये बाहेरून बिघाड झाल्यास किंवा असा
बिघाड करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा परस्पर स्थानिक स्तरावर कोणत्याही
इलेक्ट्रिशियन यांच्या मदतीन सदर पॅनल खोलण्याचा, उघडण्याचा किंवा त्यात फेरबदल
करण्याचा प्रयत्न झालेला असल्यास मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी लागू होणार नाही.
9. गुगल प्ले स्टोअर / विंडोज / इतर कोणतेही सॉफ्टवेअर सदर पॅनलमध्ये वापरताना
क्रॅक व्हर्जन किंवा व्हेरिफाइड नसलेले ऐप्लीकेशन किंवा व्हायरस / मालवेअरयुक्त
ऐप्लीकेशन किंवा असे कोणतेही अवैध सॉफ्टवेअर किंवा प्रतिबंधित ऐप्लीकेशन /
सॉफ्टवेअर / व्हिडिओ गेम ऐप्लीकेशन यांचा यामध्ये डाउनलोड / अपलोड करून वापर करू
नये. असे आढळल्यास मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी लागू होणार नाही.
10. पॅनलची तोडफोड, तूटफुट, नैसर्गिक
आपत्तीमुळे झालेली तूटफुट, चोरी किंवा हाय/लो व्हॉल्टेज फॉल्ट किंवा अर्थनिंग
जोडणी योग्य नसल्याने होणारे अपघात अशा परिस्थितीत मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी लागू
होणार नाही. तसेच याची कोणतीही जबाबदारी उत्पादक किंवा पुरवठादार यांची नसेल.
ईमेल : devgro.india@gmail.com

