देशभरात सध्या मराठी माणसाने सुरू केलेल्या शेकडो कंपन्या अग्रस्थानी आहेत. हजारो मराठी माणसांनी व्यवसायाच्या क्षेत्रात थेट संस्थापक, संचालक म्हणून किंवा मॅनेजमेंट पर्सन म्हणून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. अजूनही अनेकजण यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांना काहीअंशी यश मिळत आहे किंवा काहींना यश टप्प्यात आल्यासारखे वाटत आहे. अशा सर्व मंडळींसाठी म्हणून आम्ही 'टीम देवग्रो'तर्फे संस्थात्मक व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शन सेवा सुरू केली आहे. याबद्दल थोडक्यात माहिती अशी :
थेट दुकान टाकून किंवा आपली दर्जेदार उत्पादने थेट ग्राहकांना विकण्यात आता मराठी माणूस कुठेही मागे नाही. मात्र, संस्थात्मक व्यावसायिक क्षेत्र अर्थात सरकारी पातळीवर उत्पादन विक्री किंवा सेवा पुरवठा यामध्ये अजूनही अनेकांना सूर गावसलेला नाही. अशा व्यावसायिक असलेल्या किंवा नव्याने व्यवसायात येऊ पाहणाऱ्या मंडळींना या क्षेत्रातील व्यावहारिक मार्गदर्शन देण्यासाठी 'टीम देवग्रो'तर्फे संस्थात्मक व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शन सेवा दिली जाते.
'देवग्रो'चे संस्थापक-संचालक श्री. सचिन मोहन चोभे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सचिन चोभे यांनी यापूर्वी लेखक-पत्रकार म्हणून एक तप कर्तव्य बजावले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मराठी माध्यम एफवायबीकॉमसाठी असलेल्या क्रमिक पुस्तकात 'बीव्हीजीची यशोगाथा' हा धडा त्यांनी लिहिलेला आहे. सुप्रसिद्ध बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक-संचालक श्री हणमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. 'बीव्हीजी इंडिया'सह एव्हीजीसी ग्रुप, पुणे यांच्याकडे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
बीव्हीजी इंडिया आणि एव्हीजीसी ग्रुप या दोन्ही संस्था सरकारी वस्तुपुरवठा, सेवा पुरवठा आणि मनुष्यबळ पुरवठा यामधील अग्रगण्य संस्था आहेत. त्यांच्यासमवेत काम केल्यानंतर आता इतरही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज कंपन्यांना अशाच पद्धतीने संस्थात्मक पातळीवर काम करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन देण्याची सेवा 'टीम देवग्रो'तर्फे सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत शेकडो उद्योजक, तरुण व्यावसायिक आणि सरकारी कार्यालये यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. मराठी तरुणांना व्यावहारिक सल्ला व मार्गदर्शन देऊन भारत देशाच्या उन्नतीसाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
संस्थात्मक व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शन सेवा | Institutional Marketing Consultancy | Business Consultancy Services in Maharashtra