टेंडर - जेम सल्ला व मार्गदर्शन सेवा

टेंडर म्हटले की सरकारी रस्ते किंवा बांधकाम यांचे चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर येते. एकूणच समाजात या 'टेंडर' शब्दाबद्दल एक संशयास्पद किंवा घृणास्पद असे चित्र दिसते. एकतर अनेकांना असे वाटते किंवा काहींना याची थेट भीती वाटते. मराठी माणूस जसा व्यवसायात ताकही फुंकून पितो. अगदी त्याच पद्धतीने किंवा त्यापेक्षाही जास्त अतिशोक्ती म्हणून फ्रीजमधील ताकही फुंकून पिण्याची वृत्ती असल्यागत मराठी व्यावसायिक टेंडर शब्दापासून लांब पळताना दिसतो. तरीही काहीजण आपापल्या भागातील 'बडे ठेकेदार' म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत. मात्र, तरीही एकूण देशातील चित्र लक्षात घेता टेंडरमध्ये मराठी टक्का तिटकसा मोठा नाही. 

त्यातही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 'ठेकेदार' हा फक्त रस्ते किंवा बांधकाम याचाच असतो अशीही एक अंधश्रद्धा दिसते. सोलर, फर्निचर, आयटी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यासह स्टेशनरी यामध्येही टेंडरद्वारे खरेदी होते हेच मराठी माणसांच्या गावी नाही. सरकारी पातळीवर वस्तू किंवा सेवा पुरवठादार म्हणूनही मोठ्या संधी असल्याचे अनेकांना अजूनही माहीत नाही. परिणामी उत्तर भारतीय व्यावसायिक किंवा विशिष्ठ समजाचीच अजूनही सरकारी पातळीवरील वस्तू - सेवा पुरवठादार म्हणून मक्तेदारी दिसते. अर्थात काहीजण मराठी तरुण किंवा उद्योजक आता त्यासही छेद देण्यासाठी म्हणून टेंडर पोर्टलवर बीडर म्हणून काम करताना दिसतात हेही कौतुकास्पद आहे. 

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे. सरकारी रस्ते किंवा बांधकाम यासाठी टेंडर हा शब्द माहीत झालेले लोकल बीडर प्रस्थापित झालेले असतानाच मोठ्या रस्त्यांच्या कामातील मराठी टक्का तर अगदीच नगण्य आहे. तर, जेम पोर्टल हे अजूनही बहुसंख्य मराठी व्यावसायिकांच्या डिक्शनरीत सापडतच नाही. जीईएम पोर्टल 2016 मध्ये सुरू झाले. त्यावरून प्रतिमहिना हजारो कोटींची सरकारी वस्तू व सेवा खरेदी केली जाते. त्याबद्दल मोठे अज्ञान दिसते. मराठी व्यावसायिकांनी याही क्षेत्रात टेक्नोसॅव्ही होऊन आपला व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करायला पाहिजेत. अशाच होतकरू आणि व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्नरत असलेल्या मराठी व्यावसायिक मंडळी व तरुणांसाठी आम्ही 'टीम देवग्रो'तर्फे संस्थात्मक व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शन सेवा सुरू केली आहे.